Kolhapur News: वसुलीअभावी कर्मचाऱ्यांचे वेतन लांबले - due to the recovery, the salaries of the employees were delayed

Kolhapur News: वसुलीअभावी कर्मचाऱ्यांचे वेतन लांबले – due to the recovery, the salaries of the employees were delayed

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वसुली मोहीम तीव्र केलेली असताना जानेवारी महिन्यात वसुली असमाधानकारक असल्याचा झटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. वेतन देण्याएवढी वसुली नसल्याने तब्बल आठवड्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. अशीच स्थिती या महिन्यात राहिल्यास मार्च महिन्याचे वेतन न होण्याची भीती प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या विविध विभागात १,४०० पदे रिक्त असली, तरी सद्य:स्थितीत कायम व सेवानिवृत्त ४,२०९ कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन अदा करावे लागते. त्यासाठी महिन्याला वेतनावर १६ ते १८ कोटी रुपयांचा खर्च पडतो. दर महिन्याच्या पाच ते सात तारखेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात तब्बल आठवड्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा झाले आहे.

महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ५६ टक्के रक्कम आस्थापनावर खर्च होत असते. एकूण २१६ कोटींची रक्कम दरवर्षी त्यांच्या वेतनावर खर्च होते. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर खर्चासाठी घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट, नगररचना, अतिक्रमण आदी विभागाकडून वसुली होणे अपेक्षित असते. पण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून वसुली समाधानकारक नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होऊ लागला आहे. दर महिन्याप्रमाणे जानेवारी महिन्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन फेब्रुवारी पाच ते सात तारखेपर्यंत जमा होणे अपेक्षित होते. पण गुरुवारी (ता.१३) सायंकाळपर्यंत त्यांचे वेतन जमा झालेले नव्हते. गुरुवारी सायंकाळनंतर कर्मचाऱ्यांना वेतन जमा झालेल्या मोबाइलवर एसएमएस येऊ लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र वसुलीची ‘प्रगती’ अशीच राहिल्यास मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनापोटी आणखी झटका मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्षात दिलेल्या वसुलीच्या उद्दिष्टानुसार आतापर्यंत केवळ ५८ टक्क्यांपर्यंत वसुली झाली आहे. वसुली वाढवण्यासाठी सर्वच विभागांनी वसुली मोहीम तीव्र केली असताना स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे. मात्र उर्वरीत काळात ४२ टक्के रक्कम वसूल करण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.

…..

४,२०९

कायम व सेवानिवृत्त कर्मचारी

३,२०९

महापालिका कर्मचारी

४००

पाणीपुरवठा विभाग

४००

प्राथमिक शिक्षण मंडळ

Source link

Leave your comment
Comment
Name
Email