Kolhapur News: खंडपीठासाठी मी कोल्हापूरसोबत - i accompanied kolhapur for the bench

Kolhapur News: खंडपीठासाठी मी कोल्हापूरसोबत – i accompanied kolhapur for the bench

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी मुंबई आणि पुणे शहराचा विरोध आहे. मात्र त्यासाठी मी कोल्हापूरसोबत असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

पवार यांच्यासमोर कृती समितीचे निमंत्रक रणजित गावडे यांनी कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होण्यासाठीची पार्श्वभूमी मांडली. खंडपीठासाठी गेली ३४ वर्षे लढा सुरु आहे. कोल्हापुरात खंडपीठ स्थापन झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्षकारांसाठी फायदा होणार आहे. मुंबई हायकोर्टाची सध्याची फोर्ट येथील इमारत अपुरी पडू लागल्याने बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे हायकोर्टासाठी जागा घेवून नवीन कोर्टाची इमारत बांधण्यासाठी सुमारे ५५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याचे समजते. मात्र सरकराने हा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याऐवजी हायकोर्टाचे विकेंद्रीकरण करुन सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ स्थापन करावे. त्यामुळे सहा जिल्ह्यातील पावणेदोन कोटी नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. हायकोर्टात अनेक खटले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास बहुतांशी खटल्याची सुनावणी होवून मार्गी लागू शकतात. त्यामुळे या प्रश्नी तत्काळ लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा.

यावेळी पवार म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे खंडपीठासाठी लढा सुरु आहे. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी मी तुमच्यासोबतच राहणार आहे.’ शिष्टमंडळात गोवा आणि महाराष्ट्र बार काऊन्सिलचे माजी सदस्य महादेवराव आडगुळे, माजी अध्यक्ष अजित मोहिते, सेक्रेटरी गुरुप्रसाद माळकर, अल्ताफ पिरजादे, शिवाजीराव राणे आदींचा समावेश होता.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email