हार्दिक पांड्या फारच रोमँटिक झालाय! 

हार्दिक पांड्या फारच रोमँटिक झालाय! 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा नताशाला सरप्राईज दिलं आहे. त्याने खूपच खास लोकेशनवर आपली होणारी पत्नी, अभिनेत्री नताशा स्टेनोविकसोबत पहिलं-वहिलं व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केलं आहे. या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिकने नताशाला एक अनोखं गिफ्ट दिले. या आनंदायी क्षणाचा एक फोटो हार्दिकने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हार्दिक पांड्या हा क्रिकेटच्या जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. तो मैदानापासून दूर असूनही नेहमी चर्चेत राहतो. क्रिकेटमध्ये तर पांड्या ऑलराउंडर आहेच. शिवाय रोमँटिक लाईफबद्दल सांगायचं झालं तर तो अन्य खेळांडूंपेक्षा दोन पावले पुढे आहे. 

मागील वर्षी पांड्या बॉलिवूडच्या तमाम अभिनेत्रींसोबत डेटींगवरून तो लाईमलाईटमध्ये होता. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याची नताशा स्टेनोविक सोबत अफेअरची चर्चा रंगली. त्यानंतर, १ जानेवारीला पांड्याने नताशाला प्रपोज करून साखरपुडा उरकून चर्चांना पूर्णविराम दिला. 

आता व्हॅलेंटाईन डेवर त्याने नताशासाठी एक खास पोस्ट केले आहे. पांड्याने पुन्हा एकदा नताशाला सरप्राईज दिलं आहे. एका खास लोकेशनवर हार्दिकने नताशासोबत व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केलं आणि तिला गिफ्टही दिलं. पांड्याने नताशासोबत फोटो शेअर करून लिहिलं आहे, ‘व्हॅलेंटाईन केवळ आज नाही… तुझ्यासोबत प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन आहे… सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा…’

पांड्याने फोटो कॅप्शन लिहिली आहे की, माझी लाईफटाईम व्हॅलेंटाईन… तर नताशानेदेखील पांड्यासाठी फोटो शेअर करून आपलं प्रेम व्यक्त केले आहे. 

हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये पास न झाल्याने तो न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. बॅक सर्जरीमुळे तो मैदानापासून दूर आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरूध्द एकदिवसीय मालिकेत त्याचे पुनरागमन होऊ शकते. आता हे पाहावं लागणार आहे की, हार्दिक पांड्या कधी फिट होऊन पुन्हा मैदानावर उतरतोय?

वाचा –  BIGG BOSS 13- दहा लाख घेऊन बाहेर पडला पारस छाबडा? (photos)

Source link

Leave your comment
Comment
Name
Email