सौरऊर्जेवरील दिव्यांनी पंचायत समित्या उजळणार

सौरऊर्जेवरील दिव्यांनी पंचायत समित्या उजळणार

कोल्हापूर : विकास कांबळे

जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील दिवे आता सौरऊर्जेवर उजळणार आहेत. शासनाच्या वतीने राबविण्?यात येणार्‍या अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये देखील सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 25 पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये सोलर रूफटॉप उभारण्यात येणार आहे.

औद्योगिकरणामुळे विजेची मागणी सतत वाढत आहे. पारंपरिक साधनांवर आता मर्यादा येऊ लागल्?या आहेत. वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा, खनिज तेल यांचा साठा कमी होऊ लागला आहे. तरीही संपूर्ण ग्रामीण भागात विजेची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पंधरा ते वीस टक्के ग्रामीण भागांचे विद्युतीकरण झालेले नाही. अशा स्थितीत अपारंपरिक ऊर्जेचा विचार सुरू झाला. शासनाच्या वतीनेदेखील त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सौरऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत आहेत. 

या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा जास्तीत जास्त वापर करून वीज निर्मितीसाठी कोळसा, इंधन आदी पारंपरिक साधनांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. त्यामध्ये सौरऊर्जेकडे लोकांनी वळावे याकरिता शासनाच्?या वतीने सौरऊर्जा प्रकल्?पाला अनुदानदेखील देण्?यात येत आहे. शेतातील विहिरीवर पंपसुद्धा सौरऊर्जेवर चालत आहेत.

 महाराष्ट्रातील काही गावे सौरऊर्जेमुळे पूर्णपणे भारनियमनमुक्‍त झाली आहेत. तरीसुद्धा अजून या ऊर्जा साधनांच्या बाबतीत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. आपण जेवढी सौरऊर्जा वापरू तेवढी कमीच आहे. तिला लागणारे साधन म्हणजे सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. त्यामुळे सूर्य आहे तोपर्यंत सौरऊर्जेला तोटा नाही. तोदेखील मोफत मिळतो. सौरऊर्जेमध्येदेखील आता प्रचंड संशोधन झाले आहे. दिव्यांबरोबर घरातील विजेवर चालणारी प्रत्येक गोष्ट सौरऊर्जेवर चालू शकते. यामुळे आर्थिक बचतदेखील होत असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र हातकणंगले व शाहूवाडी पंचायत समितीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प राबवता येणार नाही. अपारपंरिक ऊर्जा विकास कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दहा पंचायत समितींमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्यांमध्येदेखील सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 25 पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email