सातारा : शरद पवारांच्या कार्यक्रमात पोलिसांना 'खुर्ची'

सातारा : शरद पवारांच्या कार्यक्रमात पोलिसांना ‘खुर्ची’

सातारा : पुढारी वृत्तसेवा

राजकीय, व्‍हीआयपींचा कार्यक्रम, दौरा म्‍हटले की मागे, पुढे, आजूबाजूला पोलिसांचा चोख बंदोबस्‍त असतो. अशावेळी पोलिसांना बसण्यासाठी खुर्ची नसते. मात्र नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राजकीय कार्यक्रमावेळी बंदोबस्‍तासाठी असणार्‍या पोलिसांना खुर्ची मिळावी’, अशी अपेक्षा राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे  व्‍यक्‍त केल्‍या होत्‍या. शुक्रवारी दस्‍तुरखुद्द पवार यांचा सातार्‍यात कार्यक्रम असताना त्‍याची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी झाली व बंदोबस्‍तासाठी असलेल्‍या पोलिसांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली.

अधिक वाचा : ज्‍युनियर शास्‍त्रज्ञांच्या प्रयोगाने शरद पवार आणि प्रतिभाताई भारावल्या

खा. शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना (दि. १०) फेब्रुवारी रोजी या संबंधी पत्र लिहले होते. या पत्रामध्‍ये म्‍हटले होते की, राज्यात मंत्री, अतिमहत्‍वाच्या व्‍यक्‍ती यांच्या दौर्‍यावेळी कायदा व सुव्‍यस्‍था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्‍त नेमला जातो. जाहीर सभांवेळी मंत्री, अती महत्‍वाच्‍या व्‍यक्‍ती येण्यापासून ते जाण्यापर्यंतच्या संपूर्ण कालावधीत पोलिसांवर ताण असतो. यावेळी सर्वच पोलिसांना तासन्‌तास तिष्ठत उभे रहावे लागते. बंदोबस्‍तावरील पोलिसांनी तत्‍पर व सज्ज असायला हवे, पण सभा सुरळीत सुरु असताना विशेषत: महिला पोलिसांना त्रास सहन करावा लागत असतो. यामुळे अशा प्रसंगी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची, आसन उपलब्ध करणे गरजेचे वाटते. यासाठी गृह विभागाने मुभा द्यावी, असेही पवार यांनी पत्रामध्ये म्‍हटले होते.Source link

Leave your comment
Comment
Name
Email