सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही : शरद पवार 

सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही : शरद पवार 

जळगाव  : प्रतिनिधी 

केंद्र शासनाने राज्याच्या विकासासाठी मदत केली पाहिजे, मात्र केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी कोणतीही मदत होत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आजकाल सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना सरकारचे रिमोट माझ्या हातात आहे. मात्र तसं काही नाही. जो मुख्यमंत्री पदाच्या जागेवर बसतो तो पक्का होतो, असे पवार यांनी म्हटले आहे. 

आर्थिक धोरण मजबूत करण्यासाठी उद्योग व व्यवसायात वाढ करण्याची गरज आहे. याच बरोबर जळगाव औरंगाबाद महामार्गाची दखल घेत ते म्हणाले की, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करायचा म्हणचे सोबत डॉक्टरचीही व्यवस्था करावी लागते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. चोपडा येथील सहकारी सूतगिरणीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्‌घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : नाशिक : सप्तश्रृंगीच्या चरणी मंत्री अनिल परब यांचे साकडे

या कार्यक्रमावेळी बोलताना पवार म्हणाले की, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा व त्याच्या घामाचे मोल त्याला मिळावे, या उद्देशाने आम्‍ही तीन्ही पक्ष एकत्र आलो आहोत. यावेळी महामार्गाच्या रस्त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, जळगाव औरंगाबाद रस्ता एवढा खराब झाला आहे, की या मार्गाने खासगी वाहनाने जायचे असल्यास डॉक्‍टरची व्यवस्था करावीच लागते. सूतगिरणीबाबत बोलताना ते म्हणाले. ”शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेला कारखाना हा शेतकऱ्यांनीच चालविला पाहिजे. तो भाडेतत्वावर देणे अयोग्य आहे. 

यावेळी केंद्रावर टीकास्त्र सोडत म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत केली पाहिजे, मात्र केंद्र शासन कोणतीही मदत करीत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत आपण संसदेत प्रश्‍न मांडणार आहोत. केंद्र शासनाच्या अर्थ धोरणावरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले देशाचे आर्थिक धोरण मजबूत करण्यासाठी उद्योग व व्यवसायात वाढ करण्याची गरज आहे,” केंद्राचे शासन त्याबाबत उदासिन असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा : ‘सीएए विरोधातील आंदोलक देशद्रोही नाहीत’

 Source link

Leave your comment
Comment
Name
Email