शिक्षक भरती सुरू करण्याबाबत राज्य शासनास सूचना करा

शिक्षक भरती सुरू करण्याबाबत राज्य शासनास सूचना करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

बंद असणारी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनास त्वरित सूचना कराव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, एस. डी. लाड यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यात 2012 पासून शाळांमध्ये शिक्षक भरती बंद आहे. त्यानंतर शासनाने सुरू केलेली पवित्र पोर्टल प्रणाली सक्षमपणे कार्यरत नाही, परिणामी शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आपण राज्य सरकारला भरती प्रक्रिया सुरू करण्यास सूचना करावी. 

कायम विनाअनुदानित शाळांमधील कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करीत आहे. त्यांचे थकीत वेतनासाठी टप्पे तत्काळ मंजूर करण्याबाबत सूचना करावी. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्‍न प्रलंबित असून तो मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, आमदार राजेश पाटील, संजय डी. पाटील उपस्थित होते.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email