विनयभंगप्रकरणी जातपडताळणी पोलिस उपअधीक्षकांना अटक

विनयभंगप्रकरणी जातपडताळणी पोलिस उपअधीक्षकांना अटक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ओळखीतील विवाहित महिलेला फोनवरून अश्‍लील व शिवीगाळ करणार्‍या पोलिस उपअधीक्षकावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र पी. जाधव (रा. सांगली) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांना राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. जाधव हे सध्या जातपडताळणी विभागात कार्यरत असल्याचे समजते.

पीडित विवाहिता 2010 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. यातून तिची जाधव यांच्याशी ओळख झाली. अभ्यासाबाबत जाधव हे तिला फोनद्वारे मार्गदर्शन करीत होते. विवाहितेशी वाढलेल्या ओळखीतून जाधव यांनी तिचा पती व मुलाला सोडून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. फोनवरून अश्‍लील शिवीगाळ व अपशब्द वापरले. तसेच अश्‍लील मेसेज पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने असे करू नका, असे बजावल्याने जाधव यांनी तिच्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद विवाहितेने राजारामपुरी पोलिसांत दिली. याप्रकरणी जितेंद्र जाधव यांना अटक केली. यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email