वाशिम : ४९ बेपत्ता मुला-मुलींना शोधण्यात पोलिसांना यश

वाशिम : ४९ बेपत्ता मुला-मुलींना शोधण्यात पोलिसांना यश

वाशिम : पुढारी वृत्तसेवा 

वाशिम पोलिसांना ४९ बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना शोधून काढण्यात यश आले आहे. वाशिम जिल्ह्यातील ७८ मुले-मुली बेपत्ता असल्याची नोंद होती. जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हयातील बेपत्ता व अपहरीत मुलीच्या प्रकरणाचा आढावा घेऊन त्यांनी यावरती कारवाई केली आहे. त्यांनी गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसविला आहे . 

वाचा :नांदेड : कर्जाला कंटाळून बाप- लेकाची आत्महत्या 

वाशिम जिल्ह्यात हरविलेल्या व पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षकांनी १२ फेब्रुवारी ला वाशिम जिल्हयातील आजपर्यंत अपहरीत झालेल्या व मुलींच्या प्रकरणाचा आढावा घेतला . वाशिम जिल्हयामध्ये २०१९ मध्ये एकूण ७८ अल्पवयीन बालकांबाबत अपहरण झाल्याच्या तकारी प्राप्त झाल्या होत्या . ७८ बालकांपैकी १६ अल्पवयीन मुले असून ६२ अल्पवयीन मुली होत्या. त्यापैकी १६ मुलांपैकी १६ मुले व ६२ अल्पवयीन मुलांपैकी ४९ मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सखरूप देण्यात आले आहे . 

वाचा :उस्मानाबाद : चीनची युवती पीएचडी अभ्यासासाठी तेरमध्ये दाखल

उर्वरीत १३ मिळून न आलेल्या प्रकरणांपैकी ७ प्रकरणे हे अॅन्टी हयुमन रॅफिकोंग युनिट यवतमाळ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. व उर्वरीत ०६ प्रकरणाचा तपास वाशिम जिल्हा पोलिस दल करीत आहे. जानेवारी २०२० सुरवातीस वाशिम जिल्हयातून एकण १५ बालके बेपत्ता झाली आहेत. त्यामध्ये १ अल्पवयीन मुलगा व १४ मुली बेपत्ता होत्या . त्यापैकी १ मुलगा व ११ मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. एकण ०९ गुन्हयाचे तपास अधिकारी यांना बोलावून त्याच्या तपासाचा आढावा घेवून त्यांना पोलिस अधीक्षक  वसंत परदेशी व अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . तसेच सदर गुन्ह्याचा तपासामध्ये तांत्रिक बाबींचा तपास करण्याची जबाबदारी सायबर सेल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

वाचा :बेरोजगारांत संताप; २०१४ ला अर्ज भरून घेत, २०२० मध्ये पाठवले परीक्षा प्रवेश पत्र Source link

Leave your comment
Comment
Name
Email