'या' क्रिकेटरने उर्वशी रौतेला हिला व्हॉट्सॲपवर केलं ब्लॉक!

‘या’ क्रिकेटरने उर्वशी रौतेला हिला व्हॉट्सॲपवर केलं ब्लॉक!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड आणि क्रिकेटर यांच्यातील नाते हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मैदानावर तुटून पडणारे अनेक क्रिकेटर बॉलिवूडच्या झगमटात अनेकदा ‘कोमल’ झालेले दिसतात. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव पहिल्यांदा हार्दिक पांड्याशी जोडले गेले. परंतु, हार्दिकने सर्बियाची अभिनेत्री नताशा स्टानकोविकशी साखरपुडा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु, आता उर्वशी आता पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण आहे, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत. 

मध्यंतरी, उर्वशी ऋषभ पंतला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, आता ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले आहे, अशी माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, उर्वशी सातत्याने ऋषभला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे ऋषभने तिला ब्लॉक केले. त्या दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतल्याचे उर्वशीच्या प्रवक्त्याने सांगितले.

ऋषभ पंतने सोशल मीडियावर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामुळे उर्वशी-ऋषभच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

वाचा – सेक्स रॅकेटमध्ये सापडली अभिनेत्री, एक्स बॉयफ्रेंडवर केला आरोप

Image result for rishabh pant

दरम्यान, उर्वशी आणि ऋषभ पंत यांचे डेटिंग सुरू असल्याची चर्चा होती. डिसेंबर २०१९ रोजी हे दोघे जुहूमधील ईस्टेला हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे, टी २० सामना सुरू होण्याच्या एक दिवसआधी हे डिनर डेटवर होते. पण ऋषभने गर्लफ्रेंड सोबतचा फोटो पोस्ट करत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

Image result for rishabh pant girlfriend ishaSource link

Leave your comment
Comment
Name
Email