मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका न्यायमूर्तींचा राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका न्यायमूर्तींचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आज अखेर आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या राज्यात मुख्य न्यायमूर्ती म्हणून जाण्याची इच्छा नसल्याने त्‍यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमानी यांनीही राजीनामा दिला होता. सलग दोन न्यायमूर्तींनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वकील मॅथ्यू नेदुम्परा यांनी एका याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी मी राजीनामा दिला आहे, आज माझा शेवटचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया दिली.  न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. ते सध्या मुख्य न्यायमूर्तीपदाच्या रांगेत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.Source link

Leave your comment
Comment
Name
Email