मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी 

मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी 


नेयॉन (स्वित्झर्लंड) : पुढारी ऑनलाईन 

युनियन ऑफ युरोप फुटबॉल असोसिएशनने प्रसिद्ध मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे आता मँटेस्टर सिटी क्लब युरोपातील महत्वाच्या युरोपियन स्पर्धेत दिसणार नाही. क्लबवर आर्थिक अनियमितचा ठपका ठेवत युईएफएने शुक्रवारी ही कारवाई केली. मँचेस्टर सिटी या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागणार आहे. 

वाचा : अखेर बुमराहला सूर गवसला, विकेटचा दुष्काळ संपला 

युईएफएने मँचेस्टर सिटी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत क्लब विरोधात बंदीची कारवाई केली. याचबरोबर त्यांना 30 लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. युईएफएने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात ‘नियामक मंडळाने मँचेस्टर सिटी क्लब विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यानुसार मँचेस्टर सिटी क्लबवर पुढचे दोन हंगाम युईएफएच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (2020-21 आणि 2021-2022) 

मँचेस्टर सिटीने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. क्लबने ‘युईएफए नियामक मंडळाच्या या निर्णयावर क्लब निराश आहे पण, हे अनपेक्षित नव्हते. तपास अधिकाऱ्याची दोषपूर्ण तपासामुळे दिलेल्या निर्णयावर शंका उपस्थित होते.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. तर युईएफएने मँचेस्टर सिटी क्लबने तपासात सहकार्य केले नसल्याचे सांगितले होते. 

वाचा : ….तर डिटेंशन कॅम्पमध्ये मीच पहिल्यांदा जाणार : मुख्यमंत्री गेहलोत 

जर्मन नियतकालिक देर स्पिएगल यांनी फुटबॉल लिक या नावाखाली मँचेस्टर सिटी क्लबचे लीक झालेले ई मेल प्रसिद्ध केले होते. त्यानंतर युईएफए या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. Source link

Leave your comment
Comment
Name
Email