बीड : अर्धवट जळालेला मानवी सांगाडा सापडला

बीड : अर्धवट जळालेला मानवी सांगाडा सापडला

माजलगाव : प्रतिनिधी 

शहरातील अशोक नगर भागात नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळला आहे. यामुळे परिसरात एक खळबळ माजली आहे. घातपाताचा संशय आसल्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजलगाव शहरात अशोक नगर भागातील खालच्या भागात आसलेल्या नाल्याच्या कडेला अर्धवट आवस्थेत जळालेला मानवी सांगाडा आढळला आहे.  या व्‍यक्‍तीस  आज्ञाताने जाळून टाकले आसल्याचे दिसून येत आहे.  आज सकाळी ११वाजण्याच्या दरम्यान लोकांनी पाहिल्‍यांनर ही घटना उघडकीस आली. पोलिस अद्याप  घटनास्‍थळी आलेले नाहीत. यासोबतच या परिसरात वॉटर कुलरचा कारखाना असल्‍याने येथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या सीसीटीव्हीवरुन या घटनेच्‍या मुळापर्यंत जाण्‍यास मदत होईल.Source link

Leave your comment
Comment
Name
Email