बाजार समिती सभापतिपदी दशरथ मानेंची निवड निश्‍चित

बाजार समिती सभापतिपदी दशरथ मानेंची निवड निश्‍चित

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी केर्ले (ता. करवीर) येथील दशरथ माने यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्तारूढ संचालक व नेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले; मात्र या बैठकीत उपसभापती निवडीचा निर्णय झाला नाही.

सत्तारूढ पॅनेलमध्ये दरवर्षी पदाधिकारी बदलण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला.  चार वर्षांत  राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, काँग्रेस, शेकाप व समरजितसिंह घाटगे गट अशा प्रत्येक गटाला  संधी मिळाली.  त्यानुसार विद्यमान सभापतिपदासाठी बाबासाहेब लाड यांना व उपसभापतिपदासाठी संगीता पाटील यांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांना देण्यात आलेली मुदत संपली होती. विधानसभा निवडणुकीमुळे दोन्ही पदाधिकार्‍यांचे  राजीनामे लांबणीवर पडले होते. रविवारी  शासकीय विश्रामगृहावर याबाबत सत्तारूढ संचालकांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आ. हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी नेत्यांनी विद्यमान सभापती  लाड व उपसभापती पाटील यांना येत्या दोन दिवसात राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानंतर  निवडणूक कार्यक्रम  प्रशासनाकडून जाहीर होईल. नूतन सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर उपसभापतींची निवड  जाहीर होणार आहे.

 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email