पुणे न्यायालयाकडून एल्गार तपास एनआयएकडे वर्ग

पुणे न्यायालयाकडून एल्गार तपास एनआयएकडे वर्ग

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास NIA कडे देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिसांनी नावंदर कोर्टात गुन्ह्याची कागदपत्र मुंबई NIA विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी ना हरकत पत्र दिले. कोर्टाने एल्गार केस मुंबई NIA न्यायालयात पाठविण्यास मान्यता दिली आहे. २८ फेब्रुवारीपर्यत एल्गार प्रकरणातील आरोपींना मुबंई एनआयए  कोर्टात हजर करावे. व कागदपत्रे मुंबई एनआयए कोर्टात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

वाचा : एल्गार तपास ‘एनआयए’कडे

पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, रॉना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वारावारा राव, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे अशा नऊ जणांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. या परिषदेनंतर दुसर्‍याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. एल्गार परिषदेत सहभागी असलेल्यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका केली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एल्गार परिषद आणि त्यानंतर कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी शरद पवार यांनी आघाडी सरकारकडे पत्राद्वारे केली होती.मात्र, त्याआधीच केंद्र सरकारच्या गृहखात्याने हा तपास पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आल्याचा आदेश काढला. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याने यास कडाडून विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.

वाचा : भीमा कोरेगाव तपासावरून शरद पवारांची नाराजी; म्हणाले…

या संबंधीची फाईल गृहखात्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मात्र, काल हा तपास एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आणि तसे पत्र गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी केंद्र सरकारला दिले आहे. आपण हा तपास राज्य सरकारला विश्वासात न घेता केंद्राकडे हस्तांतरित करण्यास विरोध केला होता.मात्र, मुख्यमंत्र्यांना अंतिम अधिकार असतात, ते वापरून त्यांनी तपास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असावा असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, आज गृहमंत्री देशमुख यांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबतही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले.

वाचा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; नवलखा, तेलतुंबडेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीचSource link

Leave your comment
Comment
Name
Email