निवडसमिती सदस्य पदासाठी अजित आगरकरचाही अर्ज दाखल

निवडसमिती सदस्य पदासाठी अजित आगरकरचाही अर्ज दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने बीसीसीआयच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज केला आहे. या वृत्ताला खुद्द अजित आगरकरने पीटीआयशी बोलताना दुजोरा दिला. अजित आगरकरने यापूर्वी मुंबईच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती अध्यक्षपद भूषवले होते. बीसीसीआयने २४ जानेवारी ही भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित केली होती. आतापर्यंत आलेल्या अर्जामध्ये अजित आगरकरचाच अर्ज सर्वात स्ट्राँग आहे. 

वाचा : NZvsIND : टी-२० च्या इतिहासात ‘असे’ पहिल्यांदाच घडले!

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की ‘अजित आगरकरचा अर्ज आल्याने निवड समिती प्रक्रियेत वेगळा ट्विस्ट आला आहे. तो नव्या नव्या संकल्पना मांडत असतो. जर कोणी शिवरामकृष्णन हे निवड समिती अध्यक्ष होतील असे म्हणत असेल तर त्यांना आता पुनर्विचार करावा लागणार आहे. यामुळे आता कोण शॉर्टलिस्ट होणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.’ आगरकर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८८ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या पुढे अनिल कुंबळे (३३४) आणि जावागल श्रीनाथ (३१५) यांचा नंबर लागतो. 

वाचा : NZvsIND : अय्यरचा फिनिशिंग टच; भारताची विजयी सलामी 

याचबरोबर अजित आगरकरने भारताकडून २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज हा निवड समिती अध्यक्षाच्या पदासाठी योग्य आहे. विशेष म्हणजे वेस्ट झोनकडून जतीन परांजपे हे निवड समितीत पहिल्यापासूनच आहेत आणि त्यांचा अजून एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे अजित आगरकरने क्रिकेट सल्लागार समितीला प्रभावित केले तर बीसीसीआय मुंबईतून दोन निवडसमिती सदस्य घेऊ शकते. 

वाचा : पंधरा वर्षाच्या कोकोने व्हिनसनंतर ओसाकाची केली शिकार

याबाबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने ‘अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पहिल्या दिवशी पारदर्शकतेबद्दल बोलले होते. जर हेतू शुद्ध असेल आणि ह्रदय योग्य ठिकाणी असेल तर आपल्याला विभागवार निवड समिती नेमण्याची आणि परंपरा पाळण्याची गरज काय? असे विचारले होते. अजित आगरकर बरोबरच शिवरामकृष्णन, नयन मोंगिया, चेतन शर्मा, राजेश चौहान या दिग्गजांची नावेही चर्चेत आहेत.  Source link

Leave your comment
Comment
Name
Email