निर्बला सीतारामन म्हटल्यास चालेल का?

निर्बला सीतारामन म्हटल्यास चालेल का?


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे घुसखोर आहेत… असे वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत सोमवारी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. कंपनी करासंदर्भातील विधेयकावर चर्चा सुरू असताना चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून तुम्हाला निर्मला सीतारामन म्हणण्याऐवजी निर्बला सीतारामन म्हणणे योग्य ठरेल का? असे विधान केले. 

कंपनी कर विधेयकावर चर्चा सुरू असताना चौधरी यांनी, कधी कधी मी आपला खूप सन्मान करतो; पण तुमची अवस्था पाहून तुम्हाला निर्मला सीतारामनऐवजी निर्बला सीतारामन म्हणणे योग्य ठरेल की नाही, असे वाटतेे. आपण मंत्रिपदावर तर आहात; पण जे काही करण्याची इच्छा आहे, ते करू शकता की नाही, हे मला माहीत नाही, असे चौधरी म्हणाले. अर्थव्यवस्था आणि घटत्या जीडीपीवरून काँग्रेसने सरकारवर टीकेचा प्रहार चालविला आहे.

जीडीपी म्हणजे रामायण, बायबल नाही : निशिकांत दुबे

कंपनी करासंदर्भातील विधेयकावरील चर्चेत सहभाग घेताना भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी जीडीपी म्हणजे रामायण – बायबल नसल्याचा उल्लेख केला. भविष्यात जीडीपीचे काहीही महत्त्व नसून समग्र सामाजिक विकास होणे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे दुबे यांनी नमूद केले. 1934 साली सर्वप्रथम जीडीपीची संकल्पना आली होती. त्याआधी जीडीपी अस्तित्वात नव्हती. केवळ जीडीपीला रामायण, महाभारत आणि बायबल म्हणणे योग्य होणार नाही. नव्या थिअरीमध्ये लोकांचा सातत्याने विकास होणे हे जास्त महत्त्वाचे आहे. 

आमच्या पक्षात सर्व सबला : सीतारामन

यावर चोखर प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी आमच्या पक्षात सर्व महिला सबला आहेत, कुणीही निर्बला नाही, असे सुनावले. Source link

Leave your comment
Comment
Name
Email