'देवेंद्र फडणवीस यांनी आता चांगला ज्योतिषी शोधावा'

‘देवेंद्र फडणवीस यांनी आता चांगला ज्योतिषी शोधावा’

संगमनेर : विशेष प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये मतदारांनी भाजपला नाकारत महाविकास आघाडीला साथ दिली आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील राजकारण आता संपत चालले आहे, अशी बोचरी टीका महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूल मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रथमच संगमनेर येथे आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

अधिक वाचा : ‘विखे पॅटर्न’ विरोधकांना पुरून उरेल

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकू शकणार नाही, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मंत्री थोरात म्हणाले, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला २२० पेक्षा जास्त जागा मिळतील असे अतिआत्मविश्वासपूर्ण वक्तव्य केले होते. तसेच विरोधी पक्षांना विरोधी पक्ष नेता मिळेल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांची कुठलीच भविष्यवाणी खरी ठरली नाही, अशी बोचरी टीका करून फडणवीस यांनी आता चांगला ज्योतिषी शोधावा, असा सल्ला ना. थोरात यांनी त्यांना दिला.

अधिक वाचा : नागरिकत्व कायदा करून जनतेची दिशाभूल

आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद का नाकारले? तुम्ही नाराज आहात का? असे प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्यावर काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची विधानसभा गटनेते पदाची आणि विकास आघाडीतील महत्त्वपूर्ण असलेल्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षातीलच दुसऱ्या सहकार्यांना पालकमंत्री पदाची संधी मिळावी म्हणून आपण स्वतःहून पालकमंत्रीपद नाकारल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा : गुन्ह्यांच्या संख्येत नगर राज्यात दुसरेSource link

Leave your comment
Comment
Name
Email