दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी टूंजी मिस युनिव्हर्स २०१९ 

दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी टूंजी मिस युनिव्हर्स २०१९ 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) ने यंदाचा २०१९ चा मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे केला आहे. जोजिबिनीने जगभरातील ९० सौंदर्यवतींना मागे टाकत विश्वसुंदरीचा मुकुट मिळवला. अमेरिकेतील अटलांटामध्ये रविवारी आयोजित करणाऱ्या ६८ व्या मिस युनिव्हर्स सोहळ्यात ९० सौंदर्यवतींमध्ये सामना झाला. या स्पर्धेत भारताच्या वर्तिका सिंह हिला टॉप १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. 

जोजिबिनीसोबत २० सौंदर्यवतीं सेमीफायनलमध्ये होत्या. ज्यामध्ये भारताची वर्तिका सिंहदेखील होती. वर्तिका टॉप-१० मध्ये पोहोचू शकली नाही. कोलंबिया, फ्रान्स, आइसलँड, इंडोनेशिया, मॅक्सिको, पेरू, पुएर्टो रीको, साउथ आफ्रीका, थायलंड आणि युनाइटेड स्टेट्सच्या सौंदर्यवतींनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले होते. 

२०१८ ची मिस युनिव्हर्स  कॅटोरिना ग्रे (Catriona Gray Philippines) ने विजेती आणि उपविजेतीच्या नावाची घोषणा केली. मॅक्सिकोची सोफिया अरागोन (Sofia Aragon) तिसऱ्या स्थानी होती. दुसऱ्या स्थानावर पुएर्टो रीकोची मॅडिसन एंडरसन (Madison Anderson) आणि दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी टूंजीने सर्वांना मागे टाकत मिस युनिव्हर्स २०१९ चा किताब जिंकला.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email