ठाणे : शहापूर वनविभागाची मोठ कारवाई; दोन कोटींचे सागवान जप्त

ठाणे : शहापूर वनविभागाची मोठ कारवाई; दोन कोटींचे सागवान जप्त

कसारा (जि. ठाणे) : शाम धुमाळ 

ठाणे जिल्ह्यातचं नव्हे तर राज्यात सर्वात मोठी कारवाई शहापूर वन विभागाच्या सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली. खर्डी वन विभागाच्या मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलातील २ कोटी पेक्षा जास्त किमतीचे सागवान जातीच्या लाकडाच्या अवैध तोडी विरूध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी २०० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  

अधिक वाचा : तब्बल ३६ वर्षांनंतर एकाच दिवशी देणार चौघांना फाशी; देशातील ‘ही’ दुसरी घटना!

शहापूर तालुक्यातील खर्डी वन विभागातून सागवान जातीच्या लाकडाची अवैधरित्‍या तोड करण्यात येत होती. तसेच या लाकडांचा लाकडी वस्तू बनविनाऱ्या कारखानदारांना पुरवठा केला जात होता अशी माहिती वन विभागाच्या वन अधिकारी प्रशांत देशमुख यांना मिळाली होती. 

या कारवाईची व्यापकता मोठी असल्‍याने शहापूर तालुक्यातील कसारा, विहिगाव, वाशालासह अन्य सहा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक, वन मजूर अशी २०० जणांची टीम तैनात करण्यात आला. मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलात सर्च ऑपरेशन करून लाकडापासून वस्तू बनविण्यासाठी लागणारे सागवान जातीच्या लाकडांच्या फळ्या, चौकट, ३० ते ३५ फूट लांब लाकडी खांब असे एकूण २ कोटी पेक्षा जास्त किमतीचे सागवान जातीचा लाकूड जप्त केला. 

अधिक वाचा : मुंबईत ‘तानाजी’चे मराठीत केवळ ५ खेळ

कारवाईत जप्त केलेले सर्व किमती लाकूड खर्डी वनविभागच्या कार्यालयात जमा करण्यात आले असून. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी व्ही, टी. घुले, आर, एच, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी प्रशान्त देशमुख पुढील तपास करीत आहेत.. Source link

Leave your comment
Comment
Name
Email