ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन 

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज निधन झाले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. रात्री उशीरा त्‍यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा : सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही : शरद पवार 

कोकणाविषयी प्रचंड आस्था असलेला कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत त्यांनी अभिनयाच्या जोरावर ६० वर्ष राज्य केले. लोकनाट्याचा राजा म्हणून मयेकर यांची विशेष ओळख होती.

अधिक वाचा : बोल्टला आव्हान देणाऱ्या राजूला क्रीडा मंत्र्यांचे निमंत्रण

दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांनी अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्यांची गुंतता ह्रदय यामधील मास्तरची भूमिका त्याकाळी खूप गाजली. कामाची सुरुवात त्यांनी कामगार रंगभूमीपासून केली. शाहीर साबळेंसारख्या अनेक दिग्गजांच्या सोबत त्यांनी काम केले. लालबाग येथे त्यांचा स्वत:चा कलाकार फोटो स्टुडिओ होता.Source link

Leave your comment
Comment
Name
Email