जिममध्ये जाताय? मग हे पदार्थ टाळाच!

जिममध्ये जाताय? मग हे पदार्थ टाळाच!

शरिराची ठेवण चांगली राखण्यासाठी किंवा सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे असल्यास स्त्री आणि पुरुष दोघेही जिमला जाणे पसंत करतात. शरीराची ठेवण सुडौल राखण्यासाठी जिममध्ये तासभर जाऊन घाम गाळतात आणि आहारावरही लक्ष ठेवतात, पण काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते. तसेच दमसास ही कमी होऊ लागतो. त्यामुळे जिममध्ये नियमित व्यायाम करणार्‍या व्यक्‍ती जर अजाणतेपणी अशा पदार्थांचे सेवन करत असाल तर आहारात बदल करण्याची हीच वेळ आहे. काही पदार्थांविषयी जाणून घेऊया ज्यांच्यामुळे दमसास कमी होतो. 

डाएट आणि एनर्जी ड्रिंक : जास्त कॅलरीज टाळायच्या म्हणून बरेचदा व्यक्‍ती डाएट ड्रिंक्सचे सेवन करतात; पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते या पेयांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास दमसास हळूहळू कमी होतो. त्याचा परिणाम व्यायाम करणार्‍या व्यक्‍तींवर खूप अधिक प्रमाणात होतो. 

कॅफिन, अल्कोहोल : कॅफिन आणि अल्कोहोल घेतल्याने प्रतिकार क्षमतेवर प्रभाव पडतो. तसेच दमसास किंवा स्टॅमिना कमी होऊ लागतो. त्यामुळे शरीराचे दैनंदिन चक्र बिघडते आणि उर्जा पातळी कमी होते. 

कार्बोहायड्रेट मुक्‍त आहार : कार्बोहायड्रेट मुक्‍त आहार जसे कुकीज, प्रेटजेल यांच्यामुळेही स्टॅमिना कमी होऊ लागतो. तज्ज्ञांच्या मते बहुतांश लोकांना असे वाटते की कार्ब्समुळे नुकसान होते. योग्य कार्बोहायड्रेट युक्‍त आहाराचे सेवन केले पाहिजे. 

पांढरा ब्रेड आणि भात : पांढरा ब्रेड हा मैद्यापासून बनवला जातो. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी ऊर्जा कमी होते. जिममध्ये जाणार्‍या व्यक्‍तींनी व्यायामानंतर ब्रेडचे पदार्थ खाऊ नयेत. पांढरा ब्रेड, भात आणि फास्ट फूडमध्ये पॉलीडीमेटिल्सिलोक्सेन हे घटक असतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि स्टॅमिना कमी होतो. 

मिल्क चॉकलेट : मिल्क चॉकलेटमध्ये उष्मांकाचे प्रमाण अधिक असते. एका संशोधनानुसार मिल्क आणि डार्क चॉकलेट स्मरणशक्‍तीसाठी फायदेशीर असतात, पण व्यायामानंतर मिल्क चॉकलेट खाल्ल्यास त्याच दमसास किंवा स्टॅमिनावर परिणाम होतो.     

 Source link

Leave your comment
Comment
Name
Email