‘चहा प्यायला पैसे’ नसणारी अभिनेत्री आता कोटींची मालकीण 

‘चहा प्यायला पैसे’ नसणारी अभिनेत्री आता कोटींची मालकीण 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना स्ट्रगल करून आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे लागले आहे. आपल्याकडे किंग खान शाहरुखचे उदाहरण सांगितले जाते. शाहरुख खान जेव्हा मुंबईत आला होता, तेव्हा त्याच्याकडे परत जाण्यासाठी पैसेदेखील नव्हते. परंतु, त्याने आपलं नशीब आजमावलं. आणि आज त्याची बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख आहे. आता अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्याकडे एकेकाळी चहा प्यायलाही पैसे नसायचे. परंतु, आता ती कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती सुंदर अभिनेत्री आहे सामंथा. 

पैशांच्या चणचणीमुळे सामंथाने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता ती अभिनेत्री बनली. सामंथा रुथ प्रभु (समांथा अक्किनेनी) असे तिचे नाव असून दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक हिट तमिळ चित्रपटांमध्ये तिने काम केले असून ‘रंगास्थलम’ आणि ‘मर्शल’ असे सुपरडुपर हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. त्याचबरोबर सामंथाने सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

सामंथाचा जन्म २८ एप्रिल, १९८७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. तिने सुपरस्टार नागार्जुनाचा मुलगा नागा चैतन्यसोबत विवाह केला आहे. सन २०१७ मध्ये सामंथा आणि नागा चैतन्य दोघे विवाहबंधनात अडकले. 

वाचा -हार्दिक पांड्या फारच रोमँटिक झालाय! 

असे म्हटले जाते की, सामंथाकडे एकेकाळी चहा प्यायलादेखील पैसे नसायचे. मात्र, तिने संघर्ष, परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपट इंडस्ट्रीत मोठी कामे मिळवली. या कामाच्या जोरावर ती आज कोट्यवधी रूपयांची मालकीण आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्याकडे जवळपास ३ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे. याशिवाय सामंथाकडे लाखोंचे मेकअप सेट आहेत. तिच्या गड्यांच्या ताफ्यात जग्वार, पोर्शे, ऑडी आदी महागड्या कार्सचा समावेश आहे.Source link

Leave your comment
Comment
Name
Email