‘गोकुळ’ निवडणूक निमित्ताने बैठकांचा जोर

‘गोकुळ’ निवडणूक निमित्ताने बैठकांचा जोर

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने आतापासूनच राजकीय पातळीवर पडघम वाजू लागले आहेत. नेत्यांच्या उघड आणि गुप्त बैठकांचा जोर सुरू आहे. 

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात सध्यातरी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत आ. पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, महाडिक यांनी शनिवारी (दि. 7) संचालक मंडळाची बैठक घेऊन पी. एन. पाटील आपल्याच सोबत असल्याचे सांगितले.‘गोकुळ’ची निवडणूक 23 एप्रिल 2020 च्या दरम्यान होईल. मल्टिस्टेटचा मुद्दा आता हद्दपार झाल्याने दूध दरवाढ आणि संचालक मंडळाच्या खर्चावरून विरोधी आघाडीने रान उठविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पुन्हा सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे.

महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात बसून सुत्रे हालविण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख संचालकांसह पॅनेलमधील महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांनी बैठका घेत आहेत.  मतदानासाठी पात्र असलेल्या प्राथमिक दूध संस्थांचे ठराव हे आपल्याला मानणार्‍या संचालकांच्या नावानेच करा. तशी खबरदारी घ्या, अशा  सूचनाही महाडिक यंत्रणेला देत आहेत. तर विरोधी आघाडीचे महाडिक आणि पी.एन. पाटील यांच्यावर बारीक लक्ष ठेवले आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणून आ. पी.एन. पाटील यावेळी आपल्या बाजूने राहतील. यासाठी विरोधी आघाडीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.   

दरम्यान, महाडिक यांनी नुकतिच सत्तारुढ संचालकांसह माजी आमदार सत्यजित पाटील, संजय घाटगे यांचे पूत्र अंबरीष घाटगे, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले सदानंद हत्तरकी यांच्याशी  चर्चा केल्यायाचे समजते. बैठकीला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आमदार पी. एन. पाटील हेही उपस्थित नसल्याचे सांगितले जाते. बैठकीत  महाडिक यांनी संचालकांना निवडणुकीच्या व्यूहरचना संदर्भात काही महत्वाच्या सूचना दिल्या. संचालकांनी नेत्यांपुढे खुलेपणाने काही मागण्या ठेवल्या. त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महाडिक यांनी दिले. संस्थांचे ठराव करताना विश्वासातील व्यक्‍तींच्या नावेच करा, हट्ट धरणारे ठरावधारक करू नका. निवडणुकीत गाफिल न राहता एकदिलाने सर्वांनी काम करूया, असे  महाडिक यांनी सुचना केल्याचे समजते. या  बैठकीला चेअरमन रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, धैर्यशील देसाई, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email