कोरोनाची दहशत; अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले !

कोरोनाची दहशत; अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले !

प्योंगयांग / नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातील आंध्र प्रदेशात एकाने आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि आपल्यामुळे आता ती पत्नीला व मुलांनाही होईल, या केवळ भीतीतून आत्महत्या केली. कोरोनाची दहशत अधोरेखित करणारी एक वेगळीच घटना उत्तर कोरियात समोर आली आहे. एका अधिकार्‍याने सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने त्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे चीनमधील अनेक शहरांमध्ये संचारबंदीसद़ृश चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येक देश काळजी घेत आहे. चीनहून आलेले एक जहाजच जपानने रोखून धरले आहे. उत्तर कोरियात मात्र कोरोनाच्या भयातून एका अधिकार्‍याला थेट गोळ्या मारून ठार केले असल्याची थरारक बातमी समोर आली आहे.

चीनमधून उत्तर कोरियात परतलेल्या एका अधिकार्‍याला संशयित रुग्ण म्हणून आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या अधिकार्‍याने चुकून सार्वजनिक शौचालयाचा वापर केला. त्यानंतर हुकुमशहा किम जोंगने त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त ‘डोन्ग-ए-इलबो’ या कोरियन वृत्तपत्राने दिले आहे. उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकार्‍याला चीनचा दौरा लपवणे महागात पडले आहे. चीन दौर्‍याबाबत माहिती लपवल्यामुळे या अधिकार्‍याची उत्तर कोरियातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी ‘यूके मिरर’ या दैनिकाने दिली आहे.

65 हजारांवर संक्रमित

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 1600 वर लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांची संख्या 65 हजारांवर गेली आहे. संक्रमितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने नेपाळ, भुतान आणि चीन सीमेवर तैनात आयटीबीपी आणि एसएसबी जवानांना सतर्कता  पाळण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली असून सीमेवर संशयितांच्या तपासणीसाठी विमानतळांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. जपान आणि दक्षिण कोरियातून येणार्‍या प्रवाशांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जहाजातील भारतीयाला लागण

जपानच्या योकोहामा बंदराच्या किनार्‍यावर रोखण्यात आलेल्या डायमंड प्रिंसेस क्रूजवरील 3711 प्रवाशांपैकी आजअखेर 218 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जहाजावर 138 भारतीय अडकलेले आहेत. यापैकी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे जहाज बंदराबाहेर एक आठवड्यापासून एकाकी उभे आहे.Source link

Leave your comment
Comment
Name
Email