कोण राज ठाकरे? अबू आझमींची खोचक टीका

कोण राज ठाकरे? अबू आझमींची खोचक टीका

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिले आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी राज ठाकरे कोण आहेत? असे म्‍हणत हल्‍ला चढवला. यासोबतच त्‍यांनी अमित शहा यांच्‍यावर देखील निशाणा साधला.

►देवेंद्र फडणवीस यांना ‘सर्वोच्च’ दिलासा! खुल्या कोर्टात सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य

अबू आझमी म्‍हणाले की, राज ठाकरे कोण आहेत? मनसेचा अवघा एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने ऐवढे मोठे केले आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही म्‍हणत आझमी यांनी राज ठाकरे यांच्‍यावर निशाणा साधला आहे.

यासोबतच मला बदबू आझमी म्‍हणणारे राज ठाकरे सध्‍या त्रस्‍त आहेत. त्‍यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. शिवसेनेला भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे. राज ठाकरे भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे. 

►फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका मंत्र्यानं दिली होती; राऊतांचा खळबळजनक खुलासा 

सध्‍याच्‍या घडीला मनसे शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार स्वतः पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम करत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असेही अबू आझमींनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांच्‍या हटवलेल्या सुरक्षेबाबतही ते म्‍हणाले की, सुरक्षा काढण्यापूर्वी लोकांना याची कल्‍पना देणे गरजेचे असल्‍याचे त्‍यांच्‍याकडून सांगण्‍यात आले.

► फोन टॅपिंगच्या आरोपावरून देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

राज ठाकरे यांच्‍या भूमिकेवर प्रश्‍न उपस्‍थितीत करत अबू आझमी यांनी अमित शहा यांच्‍यावर देखील अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले आहे. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असे म्हणत त्‍यांनी अमित शहा यांच्‍यावर निशाणा साधला आहे. 

►राज्य निवडणूक आयोगाकडून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडाSource link

Leave your comment
Comment
Name
Email