केरळात राज्यपाल आणि मुख्यमंत्री आमने-सामने!

केरळात राज्यपाल आणि मुख्यमंत्री आमने-सामने!

तिरुवनंतपुरम : पुढारी ऑनलाईन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्‍यावरुन केरळमध्‍ये डाव्‍या आघाडीचे नेतृत्‍व असलेले सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. राज्‍यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या कायद्‍याविरोधात वृतपत्तामध्‍ये देत असलेल्‍या जाहिरातीवर प्रश्‍न उपस्‍थितीत करत विरोध दर्शवला. राष्‍ट्रीय वृत्तपत्रातील सरकारच्‍या जाहिरातीवरुन  त्‍यांनी म्‍हटले आहे की, आपल्‍या राजकीय हेतूसाठी लोकांच्‍या पैशांची नासाडी करणे पूर्णपणे चूकीचे आहे. 

►तब्बल ३६ वर्षांनंतर एकाच दिवशी देणार चौघांना फाशी; देशातील ‘ही’ दुसरी घटना!

शुक्रवारी केरळ सरकारकडून वृत्तपत्रांमध्‍ये जाहिरात देवून  दावा केला होता की, राज्‍य सरकार संविधानाच्‍या मूल्‍याचे रक्षण करण्‍यासाठी तत्‍पर आहे.  तसेच या जाहिरातीत म्‍हटले होते की, सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्‍यात लागू न करण्‍यासाठी विधानसभेमध्‍ये प्रस्‍ताव सहमत केला आहे.

► ‘…तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास लष्कर तयार’ 

दिल्‍लीत असणारे केरळचे राज्‍यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एका टीव्‍ही चॅनलेला दिलेल्‍या मुलाखतीत म्‍हटले आहे की, राजकीय प्रचारासाठी सरकारी पैशाचा दुरुपयोग करणे योग्‍य नाही. सरकारी पैशाचा वापर संसदेकडून पास करण्‍यात आलेल्या कायद्‍याच्‍या विरोधात प्रचार करण्‍यासाठी केला जात आहे. ही गोष्‍ट आश्‍चर्यकारक आहे. 

आरिफ मोहम्मद खान म्‍हणाले की, जाहिरात एखाद्या राजकीय पक्षांकडून करण्‍यात आली असती तर कोणतीच समस्‍या नव्‍हती. मात्र केरळ सरकारने तीन राष्‍ट्रीय वृतपत्रात जाहिरात देवून म्‍हटले होते की, जनतेच्‍या भावना लक्षात घेवून सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरवर यावर देखील मत मांडले आहे. 

►निर्भया : लोणी लावलेल्या दोरीने दिली जाणार ‘त्यांना’ फाशीSource link

Leave your comment
Comment
Name
Email