केजरीवालांना दहशतवादी म्हणणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी मारली 'पलटी'!

केजरीवालांना दहशतवादी म्हणणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी मारली ‘पलटी’!

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी असून त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत असे मी बोललो नव्हतो, असा खुलासा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्याने भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे पराभव पत्करावा लागल्याचे जावडेकर म्हणाले. 

अधिक वाचा : ‘केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे’

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिशा’ अंतर्गत विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, ‘ दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्यानंतर काँग्रेसची मते कोणत्या पक्षाकडे गेली हे माहीत नाही. भाजप ही शिकणारी पार्टी असून, या पराभवातून आम्ही शिकणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  ‘गोली मारो’ आणि ‘भारत पाक’ ही विधाने भोवल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले,’ या कारणाबरोबरच इतरही काही कारणे आहेत.

अधिक वाचा : ‘गोली मारो’ सारखे वक्तव्य टाळायला हवे होतेSource link

Leave your comment
Comment
Name
Email