कंगना बनणार 'तेजस' पायलट | पुढारी

कंगना बनणार ‘तेजस’ पायलट | पुढारी

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कंगना राणावतच्या झोळीत आणखी एक चित्रपट पडला आहे. क्वीन कंगनाचा चित्रपट पंगा आज रिलीज झाला आहे. आता कंगना राणावत एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाचा आगामी चित्रपट ‘तेजस’ असणार असून कंगनाने आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 

कंगना म्हणाली, ‘मला नेहमीच पडद्यावर सोल्जरची भूमिका साकारायची होती. लहानपणापासून मला आर्म्स फोर्सेसचे आकर्षण होते. मी आपल्या देशाच्या जवानांप्रती नेहमीच माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते आमच्या देशाला सुरक्षित ठेवतात. आमच्या लोकांची रक्षा करतात. या चित्रपटाचे शूटिंग जुलैमध्ये सुरू होणार आहे. 

कंगना राणावत सध्या ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. Source link

Leave your comment
Comment
Name
Email