ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाईट' तमिळ चित्रपटाची कॉपी?

ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाईट’ तमिळ चित्रपटाची कॉपी?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

साऊथ कोरियन चित्रपट ‘पॅरासाईट’ला ४ कॅटेगरीमध्ये ऑस्कर ॲवॉर्ड मिळाले आहेत. या चित्रपटाला बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फॉरेन चित्रपट आणि  बेस्ट स्क्रीनप्ले असे ४ ॲवॉर्ड्स मिळाले आहेत. आता तमिळ निर्माता पी. एल. थेन्नाप्पन यांनी आरोप केला आहे की, ‘या चित्रपटाचा प्लॉट अभिनेता विजयचा चित्रपट ‘मिनसारा कन्ना’मधून चोरण्यात आला आहे. पॅरासाईट ही ‘मिनसारा कन्ना’ चित्रपटाची कॉपी असून १९९९ मध्ये ‘मिनसारा कन्ना’ रिलीज झाला होता. ‘मिनसारा कन्ना’चे राईट्स माझ्याकडे आहेत. मी ‘पॅरासाईट’ विरोधात एका आंतरराष्ट्रीय वकिलाच्या मदतीने केस दाखल करेन. त्यांनी माझ्या चित्रपटाच्या प्लॉटची कॉपी केली आहे.’ 

काय आहे कोरियन चित्रपटाचा प्लॉट?

बॉन्ग जून हो यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘पॅरासाईट’ एक अशा कुटुंबाची कहाणी आहे, ज्यामध्ये एक गरीब परिवारातील सदस्य हळूहळू एका श्रीमंत घरामध्ये कामाच्यानिमित्ताने प्रवेश करतात. आणि अन्य कोणालाही हे माहिती होत नाही. विशेष म्हणजे, कानासाठी एकाच घरामध्ये प्रवेश मिळवूनही ते एकमेकांना ओळख दाखवत नाही. कारण, त्यांना उघड करायचे नसते की, ते एकमेकांचे नातलग आहेत.  

ही आहे तमिळ चित्रपटाची कहाणी 

साऊथ स्टार विजयचा १९९९ मध्ये रिलीज झालेला तमिळ चित्रपट ‘मिनसारा कन्ना’मध्ये मोनिका कास्टेलिनो, रम्भा आणि खुशबू सुंदर मुख्य भूमिकेत होत्या. यामध्ये कन्नन (विजय)ला इश्वर्या (मोनिका कास्टेलिनो) शी प्रेम होतं. इश्वर्याची मोठी बहिण इंदिरा देवी (खुशबू) एक श्रींमत महिला असते. कन्नन आपली ओळख लपवून त्यांच्या कुटुंबात बॉडीगार्ड म्हणून काम करू लागतो. त्यानंतर कन्ननचा लहान भाऊ वेत्री नोकर म्हणून तिच्या बहिणाच्या घरात कुक म्हणून काम करू लागतो. इंदिरा देवीला माहिती नसतं की, तिच्या घरात काम करणारे हे लोक एकाच कुटुंबातील आहेत. 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email