उत्सुकता, धाकधूक अन् आनंदोत्सव | पुढारी

उत्सुकता, धाकधूक अन् आनंदोत्सव | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

वाचक बक्षीस योजनेत विनामूल्य सहभागासाठीची ‘कूपन कापा, चिकटवा, सहभागी व्हा… हजारो बक्षीसे मिळवा’ या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेले कष्ट, लाखो रुपयांच्या हजारो बक्षिसांची उत्सुकता, बक्षिसाचे मानकरी आपण ठरणार का? याबद्दलची धाकधूक आणि लकी ड्रॉनंतर बक्षीस जाहीर होताच होणारा आनंद, अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी ‘पुढारी’ धनवर्षा वाचक बक्षीस योजनेची सोडत झाली.

ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दिमाखदार समारंभाने सोडत झाली. महापौर निलोफर आजरेकर, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, ‘करवीर’चे प्रांताधिकारी वैभव नावडकर, ‘आसमा’चे अध्यक्ष राजीव परुळेकर, ‘तनिष्क’चे संचालक प्रसाद कामत व जय कामत यांच्या हस्ते योजनेत सहभागी भाग्यवान वाचकांची सोडत काढण्यात आली. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहायक सरव्यवस्थापक (प्रशासन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) मिलिंद उटगीकर, के. आर. टीव्हीएसच्या व्यवस्थापक अर्चना घाटगे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रसाद कामत यांनी भरघोस बक्षिसांबरोबरच पारदर्शी सोडतचे आवर्जून कौतुक करून वाचकांचे आणि बक्षीस विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. राजीव परुळेकर यांनी, योजनेला प्रतिवर्षीप्रमाणे भरघोस प्रतिसाद मिळाला. माध्यम क्षेत्रातील माझ्या करिअरची सुरुवात ‘पुढारी’तूनच झाल्याचे आवर्जून सांगून आजचा कार्यक्रम आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. अनिल पाटील यांनी, दैनिक ‘पुढारी’ राज्यभरातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचला असून, या माध्यमातून लाखो वाचकांना जोडण्यात आले आहे, असे सांगत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे असणार्‍या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचा पुढचा सन्मान आय.जी. म्हणून करण्याची संधी ‘पुढारी’ला मिळावी, अशी शुभेच्छा दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘पुढारी’तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नव्या ‘सब खेलो, सब जीतो..’ या योजनेची चित्रफीत दाखवून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विश्‍वराज जोशी (आर. जे. बोलबच्चन) यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. 

51 लाखांची 20 हजारांहून अधिक बक्षिसे

‘पुढारी’ धनवर्षा वाचक बक्षीस योजनेचा 51 लाख रुपये किमतीची 20 हजारपेक्षाही अधिक बक्षिसांची ही योजना होती. वाचकांच्या उदंड प्रतिसादात 13 जून 2019 ते 14 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कोल्हापूर शहर व जिल्ह्यासाठी ही योजना राबवण्यात आली. योजनेसाठी प्रथम बक्षीस 12 टीव्हीएस ज्युपिटर हे योजनेचे प्रमुख आकर्षण होते. याचबरोबर साडेतीन तोळे सोन्याची 14 बक्षिसे, गृहोपयोगी गॅस शेगडीची 14 बक्षिसे, सोन्याची नाणी (प्रत्येकी 1 ग्रॅमची 22 बक्षिसे), इलेक्ट्रिक टिफिन बॉक्सची 26 बक्षिसे, लेटेस्ट लेडीज ड्रेससाठी 2 हजार किमतीची एकूण 30 खरेदी कूपन्स, थर्मोस्टील फ्लास्कची 62 बक्षिसे, सुरक्षित वाहतुकीसाठी 102 हेल्मेट्स, इन्श्युलेटेड हॉट अँड कोल्ड बिग जार 10 हजार यासह इतर 10 हजारांहून अधिक आकर्षक बक्षिसांचा समावेश योजनेत होता.

संपूर्ण जिल्ह्याचा समावेश…

‘पुढारी’ धनवर्षा वाचक बक्षीस योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी राबविण्यात आली. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, गडहिंग्लज-चंदगड-आजरा, शिरोळ-हातकणंगले, भुदरगड-राधानगरी, पन्हाळा-शाहूवाडी, करवीर-गगनबावडा अशा प्रत्येक तालुक्यातील वाचकांनी सोडतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामुळे सोडतीच्या सोहळ्यास संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतून शहर व ग्रामीण भागातून दैनिक ‘पुढारी’चे वाचक सहकुटुंब-मित्रपरिवारासह सकाळी 9 वाजल्यापासूनच शाहू स्मारक भवनमध्ये उपस्थित होते. उपस्थित वाचकांसह मान्यवरांचे स्वागत दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी केले.

पारदर्शी सोडतीचे कौतुक…

‘पुढारी’ समुहातर्फे योजनेची सोडत अत्यंत पारदर्शी पद्धतीने नेहमीच आयोजित केली जाते. संपूर्ण जिल्ह्यातील सहभागी वाचकांची कूपन एकत्रित केल्यानंतर ती तालुका आणि परिसरनिहाय वेगळी करण्यात आली. तालुकानिहाय स्वतंत्र पारदर्शी पेट्यांमध्ये ती मंचावर उपस्थितांसमोर ठेवण्यात आली होती. योजनेतील प्रत्येक बक्षिसानुसार प्रत्येक परिसर व तालुक्याच्या पेटीतून मान्यवरांसह उपस्थित वाचकांच्या आणि बालकांच्या हस्ते कूपन्स काढून ती बक्षीसनिहाय स्वतंत्र पारदर्शी बरणीत सर्वांसमोर मांडण्यात आली. लकी ड्रॉतील सर्व कूपन्स काढल्यानंतर त्यातील विजेत्यांची नावे मान्यवरांकडूनच घोषित करण्यात आली.

‘पुढारी’च्या विश्‍वासार्हतेला सलाम…

सोडत योजनेसाठी जिल्हाभरातून वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही कुपन्स वाचकांच्या हस्तेही काढण्यात आले. यात शारदा मदने (उचगांव), संतराम जाधव (घुणकी), सदाशिव निकम, शुभांगी सिंघन, श्रीमती चौगले, श्रेयश तोडकर, शशिकला रोटे आदींसह बालचमू, ज्येष्ठ नागरिक व महिला आदींचा समावेश होता.

यावेळी बोलताना संतराम जाधव म्हणाले, वाचायला शिकलो तेव्हापासून पुढारीचा वाचक झालो आहे. सकाळी 6 वाजून 10 मिनीटांनी घरात पुढारीचा अंक येतो. ऊन्हाळा-पावसाळा-हिवाळा या तिन्ही ऋतूत जिल्ह्याभरातील वाचकांच्या घरापर्यंत ‘पुढारी’ पोहोचतो. दिवसाची सुरुवात चहा आधी ‘पुढारी’ वाचनानेच होते. दौर्‍यासाठी बाहेरगावी जाऊन आल्यानंतर घरात आल्यावर पुढारी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. पुढारी चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी’च्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच विकासासाठी विविध योजना आणण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचेही संतराम जाधव यांनी आवर्जुन सांगितले. शारदा मदने यांनी, पुढारी प्रत्येक वाचकाची आवड-निवड जपण्याबरोबरच वाचकांच्या सुचनांची आवर्जुन दखल घेत असल्याचे सांगितले. तर अनेक वाचकांनी ‘पुढारी’ने वाचनाची सवय लावली, पुढारीवर आमची श्रध्दा आहे, वृत्तपत्र म्हणजे ‘पुढारी, पुढारी आणि पुढारीच…’ अशा बोलक्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. मान्यवरांकडून काढण्यात आलेल्या कुपन्समध्ये भाग्यवान विजेती ठरलेली शर्वरी तोडकर हिचा भाऊ श्रेयश तोडकर सभागृहात उपस्थित होता. श्रेयसने  व्यासपीठावर येऊन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बहिणाला मिळालेली ही अनोखी भेट असल्याचे आवर्जुन सांगितले.

बहारदार गीतांनी वातावरण निर्मिती..

बक्षीस सोडत योजनेची रंगत बहारदार हिंदी-मराठी गीतांच्या योजनांनी वाढविली. ’गुंजन’ व ‘संगीतम’ या वाद्यवृंदाच्या कलाकारांनी एकसेबढकर एक गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सादर होणारे प्रत्येक गीताला चित्रफिताची जोड असणारा अनोखा प्रयोग केल्यामुळे उपस्थितांकडून वाहवा मिळत होती. यात गायक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत सालियन, बुधवारपेठ पन्हाळा येथील न्यू हायस्कूलचे शिक्षक राम भोळे, देवचंद कॉलेज निपाणीच्या प्रा. डॉ. सविता देसाई, सोहम मुनिश्वर यांचा या वाद्यवृदांत समावेश होता. 

मी गेली 40 वर्षे ‘पुढारी’ची वाचक आहे. नवीन गाडीची इच्छा प्रथम बक्षीस ज्युपिटर मिळाल्यामुळे पूर्ण झाली. त्याबद्दल ‘पुढारी’ची आभारी आहे.

– प्रमिला कापशे

शिवाजी पेठ


माझ्या पत्नीने नियमितपणे कूपन चिटकवल्यामुळे मी योजनेत सहभागी होऊ शकलो. ज्युपिटर मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला. 

-रविराज कुंभार 

बापट कँप


 मी बरेच वर्षे ‘पुढारी’चा वाचत आहे. एका निष्ठावंत वाचकाचा या बक्षिसामुळे सन्मान झाला आहे. दुचाकी घेण्याची माझी इच्छा ‘पुढारी’मुळे पूर्ण झाली.  

-अभिषेक सावंत

लाईन बझार


 शेतात काम करताना ही आनंदाची बातमी समजली. या  बक्षिसामुळे आमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 

-छायाताई पाटील

रा. भुयेवाडी, ता. करवीर


अनेक वर्षांपासून मी दैनिक ‘पुढारी’चा वाचक आहे. नवीन दुचाकीची गरज होती. ती इच्छा दैनिक ‘पुढारी’ने पूर्ण  केली. याबद्दल ‘पुढारी’ परिवाराचे आभार.  

– राजेंद्र कांबळे 

रा. कोथळी, ता. करवीर


माझ्यासारख्या सामान्य वाचकाला बक्षीस मिळाले. वाचकांसाठी अशाच बक्षीस योजना सुरू ठेवाव्यात. ‘पुढारी’चा  लौकिक आणखी वाढवा हीच सदिच्छा.

-आनंदा जाधव

जैन्याळ, ता. कागल


मुलांच्या मदतीने धनवर्षा बक्षीस योजनेत सहभाग घेतला. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत रुजलेल्या दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून  दुचाकीचे स्वप्न साकार झाले.

-गीता मोहिते

आजरा


 सातवीपासून दैनिक ‘पुढारी’ची वाचक आहे. ‘पुढारी’ वाचला नाही तर चुकल्यासारखे वाटते. नवीन गाडीचे स्वप्न  दैनिक ‘पुढारी’मुळेच पूर्ण झाले.

-अश्‍विनी साळवी

गारगोटी, ता. भुदरगड


दै.‘पुढारी’कडून दरवर्षी नवीन योजना राबवल्या जातात. दोन वेळा बक्षिसाने हुलकावणी दिली. तिसर्‍या योजनेत  बक्षिस लागल्याने कष्टाचे फळ मिळाले. 

-मयूर निमणकर

इचलकरंजी


दै. ‘पुढारी’ नेहमीच सामाजिक प्रश्‍नांत भाग घेऊन सोडवणूक करतो. माझी दुचाकी चालवावी, अशी लहानपणापासूनची इच्छा होती, ती आज दै. ‘पुढारी’ने पूर्ण केली. 

-सौ. शहनाज जमादार 

दानोळी, ता. शिरोळ

प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी (12 टीव्हीएस ज्युपिटर)

प्रमिला श्रीकांत कापशे (फिरंगाई तालमीनजीक, शिवाजी पेठ), रविराज दगडू कुंभार (संत गोरा कुंभार वसाहत, बापट कँप), अभिषेक अनंत सावंत (अष्टेकरनगर, लाईन बझार), मनोज मधुकर सुतार (राजोपाध्येनगर, साने गुरुजी), छाया शिवाजी पाटील (भुयेवाडी, ता. करवीर), राजेंद्र सीताराम कांबळे (कोथळी, ता. करवीर), आनंदा पांडुरंग जाधव (जैन्याळ, ता. कागल), गीता उदय मोहिते (जिजामाता कॉलनी, ता. आजरा), अश्‍विनी अरविंद साळवी (सोनाळी, ता. भुदरगड), पूजा सुनील चावरे (मलकापूर, ता. शाहूवाडी), शहनाज दस्तगीर जमादार (दानोळी, ता. शिरोळ), मयूर गजानन निमणकर (सांगली नाका, इचलकरंजी).

Source link

Leave your comment
Comment
Name
Email