अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं 'हे मले सैन नाही होत...'

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं ‘हे मले सैन नाही होत…’

मुंबई : पुढारी ऑनलाईन   

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास गाणं गायलं आहे. एक इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे गाणं खूप सुंदर आणि सुरेल आवाजात त्यांनी गायलं आहे. असं असलं तरी नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. 

अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लोकप्रिय इंग्रजी गायक lionel richie चं गाणं आपल्या आवाजात गायलं. त्यांनी व्हॅलेंटाईन डेला हे गाणं रिलीज केलं होतं. lionel richie याने हे गाणं गायलं होतं. अमृता यांनी आपल्या आवाजात गायलेलं हे गाणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी अमृता यांच्या गाण्याची खिल्ली उडवली आहे. 

ट्विटरवर अमृता यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. एका युजरने म्हटले आहे ‘हे मले सैन नाई होत.’ ‘नाळ’ चित्रपटातील श्रीनिवासच्या फोटोसह हा डायलॉग स्क्रीनशॉट करून शेअर केला आहे. तर दुसऱ्या युझरने म्हटले आहे-‘अमृता यांचे गाणं रानू मंडला यांच्यापेक्षा चांगलं आहे.’ 

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील हे गाणं पाहा –

Source link

Leave your comment
Comment
Name
Email