अतिक्रमण काढताना वादावादी | पुढारी

अतिक्रमण काढताना वादावादी | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी महानगरपालिका व शहर पोलिस शाखा यांनी संयुक्‍तपणे सुरू केलेली अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम शनिवारी सुट्टी असतानाही दुसर्‍या दिवशी सुरूच ठेवली. चप्पल लाईन व बिंदू चौकातून लक्ष्मीपुरीकडे जाणार्‍या रस्त्यावरील साहित्य उचलताना अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचारी व व्यापारी यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शहरामध्ये रस्त्याकडेला बसणार्‍या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अशा रस्त्यांची पाहणी करून त्या रस्त्यावर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारपासून महापालिका व शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम सुरू करण्यात आली. शनिवारी सुट्टी असतानाही दुसर्‍या दिवशी ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकाचे कर्मचारी आणि पोलिस सीपीआर चौकात जमले. तेथून त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. 

सीपीआर चौक, महानगरपालिका, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, करवीर नगर वाचन मंदिर, बिंदू चौक, शिवाजी रोड, चप्पल लाईन, पापाची तिकटी, महापालिका, लुगडी ओळ, प्रभात टॉकी याठिकाणी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविली. अतिक्रमण निर्मुलनाची गाडी, डंपर व 25 कर्मचार्‍यांसह ही मोहीम राबविण्यात आली. चप्पल लाईन रोडवरील रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू उचलताना येथील व्यापार्‍यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. परंतु, महापालिका कर्मचार्‍यांनी त्यांना दाद दिली नाही. विरोध झुगारून कर्मचार्‍यांनी याठिकाणी कारवाई केली. बिंदू चौकातून लक्ष्मीपुरीकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमण काढतानाही वाद झाला. आजच्या कारवाईत रस्त्यावर ठेवलेल्या 135 ते 140 लोकांच्या वस्तू जप्‍त  करण्यात आल्या.  

Source link

Leave your comment
Comment
Name
Email